खानापूर / वार्ताहर
खानापूर तालुक्मयात गुरुवारी तसेच शक्रवारी दिवसभरात झालेल्या वळीवाच्या पावसाने सर्वत्र ओलावा झाला आह.s मात्र या वळीवाचा फटका खानापूर गुंजी लोंढा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. या महामार्गाच्या विकासाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने मागील पावसाळय़ापासून या मार्गाची वाताहत झाली आहे. खानापूर ते अनमोड पर्यंत रस्त्याचे काम बिल्डकॉन कंपनीचे घेतले आहे या रस्त्याचा बहुतांश कामाचे व रस्त्यावर येणाऱया मोरया व बंधाऱयांची कामे पूर्ण झाली असली तरी ठिकाणी अवघड ठिकाणी रस्ते विकास रखडला आहे. सावरगाळी नजीकच्या रस्त्याचे व पुलाचे काम रखडले याठिकाणी गेल्या मागील पावसाळय़ापासून वारंवार गाडय़ा अडकण्याचे प्रकार घडल्याने वहातुकीचा बोजवारा उडाला होता. पुन्हा काम रखडल्याने गेल्या दोन दिवसात झालेल्या वळीवाच्या पावसाने अनेक ठिगाणी दलदल निर्मान होऊन वहातुक रखडली आहे.
या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ब्रिज बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आह.s परंतु धीम्या गतीने काम सुरू असल्याने याठिकाणी वळीवाच्या तडाक्मयात रस्त्याची पुन्हा वाताहात झाली आहे. पर्यायी काढण्यात आले रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून पुन्हा वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. एक दोन ठिकाणी तर दलदल निर्माण झाल्याने दुचाकी धारकाना कसरत करावी लागत आहे. काळी माती रस्त्यावर टाकण्यात आल्याने निसरडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग यावषीही अडचणीचा ठरला आहे. या रस्त्याच्या कामात असीच्हा दिरंगाई झाल्यास या वषीचा पावसाळा देखील या भागातील प्रवाशाना त्तासाचा ठरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
होनकल ते अनमोड पर्यंतच्या रस्त्याचे काम बिल्डकॉन या कंपनीने हाती घेतले असले तरी रस्त्याच्या विकास कामास पर्यावरण व त्याचा अडथळा निर्माण झाल्याचे समजते त्यामुळे संबंधित कंत्राटी कंपनीचे देखील कामासंदर्भात पुरेसे लक्ष घातले नाही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे या भागातील रस्त्या संदर्भात तक्रारी गेल्याचे समजते त्यामुळे कंत्राटी कंपनीने देखील तेथून हरित सिग्नल मिळेल तोपर्यंत काम करण्याचे स्थगित केले आहेत. वास्तविक या रस्त्याच्या विकासकामात कोणताच अडसर नाही यापूर्वी या रस्त्याच्या दुतर्फा असलेली माडीगुंजी पर्यंतची सर्व झाडे व त्यापुढची झाडेही निकामी करण्यात आली आहेत दुतर्फा रस्त्याचे काम अपेक्षित रुंदी प्रमाणे मोकळे करण्यात आले आहे तर आता फक्त रस्ता विकास काम करताना अडथळा का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या एकूण दुहेरी मार्गापैकी बहुतांश ठिकाणी एकेरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे अनेक ठिकाणी रस्ता कामासाठी खोदाई काम हाती घेण्यात आले आहे परंतु अनेक ठिकाणी खोदाई करून तसेच काम टाकण्यात आले असल्याने अवेळी पावसाने पाणी साचून दलदल निर्माण होत आह.
s गेल्या दोन-तीन दिवसात अवेळी पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे रस्त्याची अनेक ठिकाणी रस्ता उखडून टाकण्यात आल्याने व त्या ठिकाणी केवळ माती टाकण्यात आल्याने अवजड वाहनांमुळे रस्त्यावर वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत तर अनेक ठिकाणी निसरड निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे यासाठी संबंधित कंपनीने येत्या पावसाळय़ा पूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास या वषीचा पावसाळय़ातही खानापूर लोंढा मार्ग वाहतुकीसाठी अडचणीचा ठरणार यात शंका नाहा.r









