उचगांव / वार्ताहर
वळिवडे ता. करवीर येथील अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याबद्दल पंकज राजेंद्र कांबळे ( मुळ रा. येवती, ता. करवीर, सध्या रा. माळवाडी वळीवडे ) या तरुणावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की पीडित मुलगी बाजार आणण्यास गेली होती. ती परत घरी आली नाही म्हणून नातेवाइकांनी चौकशी केली असता पंकज कांबळेने तिला काही तरी आमिष दाखवले व तिला त्याने मोटरसायकल ( एम एच 09- ईवाय0734) वरून पळवून नेल्याचे समजले. याबाबत पंकज कांबळेवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मलमे करत आहेत.
Previous Articleरत्नागिरीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे बुडाले
Next Article ….तर रामराज्य येईल









