वार्ताहर/ सावईवेरे
वळवई फोंडा येथील श्री गजान्तलक्ष्मी संस्थानचा जत्रोत्सव उद्या दि. 14 रोजी साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी 6.30 वा. श्रींच्या पालखीचे मंदिरात आगमन. स. 7 वाजता आरती होतील. त्यानंतर देवीची पालखी मूळस्थानी जाऊन ओवाळकी होऊन पुन्हा मंदिरात येईल. कोरोना महामारीमुळे दिवजोत्सवात सुवासिनींनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्रींच्या कौलानुसार दुपारी महाप्रसाद नसेल तसेच दिवजोत्सव झाल्यानंतर ओटय़ा स्वीकारण्यात येतील. सायं. 7 वा. रथोत्सव होईल. त्यानंतर रात्री 9.30 वा. गजांतलक्ष्मी कलासंघ वळवई निर्मित संगीत ‘संकासूर वध’ काला होईल. मंदिर परिसरात दुकाने थाटण्यात परवानगी नाकारण्यात आलेली असून भाविकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे, असे देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.









