मुंबई
आयटी आणि बीपीओ क्षेत्रासाठी वर्क फ्रॉम होमची मुदत आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली असल्याचे सरकारने नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रासह बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंगच्या कंपन्यांमधील कर्मचाऱयांना 31 डिसेंबरपर्यंत घरातूनच काम करावे लागणार आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाचा कहर उत्तरोत्तर वाढतच असल्याने कंपन्यांनी यापुढेही खबरदारी घ्यायची गरज आहे. सध्या 85 टक्के आयटी क्षेत्रातील कर्मचारी घरातून काम करत असल्याची माहिती आहे.









