बेळगाव
वरेरकर नाटय़ संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. संघाच्या महावीर मिरजी सांस्कृतिक भवनात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड मुकुंद परब हे होते.
प्रारंभी संघाचे दिवंगत कार्याध्यक्ष अशोक याळगी व कार्यकारिणी सदस्य ललित मुतकेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यवाह जगदीश कुंटे यांनी गतवर्षीचा अहवाल तसेच जमाखर्च सादर केला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संस्थेचे ऑडिटर मे. मराठे, हरगुडे ऍन्ड कं. यांची फेर नेमणूक झाली. यावर्षी सत्कार झालेल्या कलामहर्षी कला दालनाची संपूर्ण माहिती सभेला देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य नाटय़ स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल कलाकारांचे अभिनंदन करण्यात आले. नव्या, तरुण नाटय़ कलाकारांना सदस्य घ्यावे अशी सूचना मनिषा सुभेदार यांनी मांडली तर नाटय़ विषयक कार्यक्रम घडवून आणावेत असे मत वृषाली मराठे यांनी मांडले. ऍड. मुकुंद परब यांनी अध्यक्षीय समारोप केला.









