मागीलवषीची पुन्हा आठवण, अनेक घरांत शिरले पाणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी रात्रीपासून धुवाधार पावसाने शहरासह संपूर्ण तालुक्मयाला झोडपले. यामुळे पुन्हा एकदा साऱयांच्याच मनात धडकी निर्माण झाली आहे. पावसामुळे यावषीही अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडाली. जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाल्यामुळे शहर व उपनगरांमध्ये अनेक झाडे कोसळली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागला. यावर्षीच्या दमदार पावसाला खऱया अर्थाने आता सुरुवात झाली. मात्र या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. बुधवारी बेळगाव जिल्हय़ात एकूण 653 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मागीलवषी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला होता. त्यानंतर आता यावषीही त्याचप्रकारे धुवाधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मंगळवारी रात्री धुवाधार पावसाने सुरुवात केली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येळ्ळूर रोडवरील अन्नपूर्णेश्वरनगर, केशवनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी कंबरभर पाणी साचले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावरच गुडघाभर पाणी साचून होते. गटारीतून पाणी जाण्यास वाट नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. अन्नपूर्णेश्वरनगरला जणू तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसामुळे काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. बसवाण गल्ली येथे कारवर भिंत कोसळून मोठे नुकसान झाले. या पावसाच्या रुद्रावतारामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बुधवारी पहाटेपासून पावसाला आणखीन जोर वाढला. दिवसभर पाऊस सुरूच होती. यामुळे सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले होते. अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. गांधीनगर येथील ओव्हरब्रिजखाली कंबरभर पाणी साचून होते. त्यामधून वाहने चालविताना कसरत करावी लागत होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. याचबरोबर झाडेही उन्मळून पडली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या व झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी रात्रीपासूनच वीज गायब झाली होती. पाऊस जोरात असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणे हेस्कॉमच्या अधिकाऱयांना अशक्मय झाले. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील अनेक गावांना अंधारातच रहावे लागले. पावसाळय़ापूर्वी दुरुस्ती करणे तसेच विद्युततारांना स्पर्श करणारी झाडे तोडणे आवश्यक होते. मात्र हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे आता पावसात याचा फटका साऱयांनाच बसू लागला आहे.
या धुवाधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले. हे पाणी काढण्यासाठी विद्युत मोटारींचा वापर करणे गरजेचे होते. मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विद्युत मोटारी जोडणे कठीण झाले. त्यामुळे नागरिकांना घरात आलेले पाणी बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. दिवसभर दमदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. पावसामुळे रस्त्यांवर लॉकडाऊनची परिस्थिती दिसत होती.
यावषी मान्सूनचे वेळेत आगमन झाले. मान्सूनने चांगली साथ दिली. आतापर्यंत वरुणराजाने उत्तम साथ दिली आहे. अधिक पावसामुळे नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी-नाल्यांचे पाणी शिवारात शिरले आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱयांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
बळ्ळारी परिसराला पुन्हा पूर
बळ्ळारी नाल्याला दरवषीच पूर येतो. यामुळे शेकडो एकर जमिनीतील भात पीक खराब होत असते. सध्या सुरू झालेल्या दमदार पावसामुळे बळ्ळारी परिसरातील शिवारात पाणी तुडुंब भरले आहे. त्यामुळे काही एकरमधील भात पीक पाण्याखाली गेले आहे. बळ्ळारी नाल्याला येळ्ळूर धरणाचे पाणी तसेच वडगाव, आनंदनगर, केशवनगर, अनगोळ परिसरातील डेनेज व गटारींचे पाणी येत असल्यामुळे या नाल्याला पुन्हा पूर आला आहे.
शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळली
जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन झाल्यामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी झाडे कोसळली आहेत. अशोक सर्कलजवळील नवीन स्मार्ट बसथांब्यावरच सरकारी विश्रामधाम कंपाऊंडमधील झाड कोसळले आहे. यामुळे बसथांब्याचे नुकसान झाले आहे. उपनोंदणी कार्यालयाजवळ झाडाची फांदी पडली असून त्यामुळे केबल व विद्युततारांचे नुकसान झाले आहे. कॅम्पमधील थिम्मय्या रोडवर झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळली आहे. त्यामुळे विद्युततारा झुकल्या आहेत. याचबरोबर बेळगाव-वेंगुर्ला रोड, येळ्ळूरच्या वेशीत नारळाचे झाड कोसळले आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये झाडे पडली असून घरांचीही पडझड झाली आहे.
फळ, भाजी विपेत्यांना फटका
शहरातील व्यापाऱयांना या पावसाचा दणका बसला आहे. फेरीवाले, भाजी विपेते याचबरोबर इतर विपेत्यांना पावसाचा फटका बसला आहे. यामुळे शहरामध्ये गर्दी कमी असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता शहराकडे फिरकली नाही.
महात्मा गांधी कॉलनीत शिरले पाणी
टिळकवाडी येथील महात्मा गांधी कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे महिलावर्गाला त्याचा मोठा त्रास झाला. दोन दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मागील वर्षाची आठवण पुन्हा एकदा या परिसरातील नागरिकांना झाली आहे.
नदी, नाल्यांचे पाणी रस्त्यावर शहराला लागूनच असलेल्या मार्कंडेय नदी तसेच बळ्ळारी नाल्याचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा शहराशी असणारा संपर्क तुटला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर आणखी काही गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवारातील तसेच शहरातील नाल्यांचे पाणी नदीला व मुख्य नाल्यांना जात आहे. त्यामुळे मार्कंडेय नदी ओसंडून वाहू लागली आहे. या नदी परिसरातील हजारो एकर जमिनीतील पीक पाण्याखाली गेले आहे.