प्रतिनिधी / बेळगाव
‘आजादी का अमृतमहोत्सव’ निमित्ताने गणपत गल्ली क्लस्टरच्या बेननस्मिथ हायस्कूल बेळगाव येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत बेळगाव येथील वनिता विद्यालय कन्नड आणि मराठी माध्यम हायस्कूलच्या विद्यार्थिनी स्फूर्ती वालिकार आणि स्नेहा अगसर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्येसुद्धा प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यांना मुख्याध्यापिका शालिनी हुदली यांचे सहकार्य लाभले असून गणपत गल्ली क्लस्टरचे सीआरपी पाटील आणि शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनींच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल गटशिक्षणाधिकारी बजंत्री यांनी कौतुक केले
आहे.









