प्रतिनिधी/ सातारा
ऑक्टोबर 2021 महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यात झालेल्या विविध पूजा साहित्य भांडार दुकानावर झालेल्या कारवाई मध्ये, इंद्रजाल(ब्लॅक कोरल) , रेड सी फॅन , हत्ता जोडी(घोरपडीचे गुप्तांग) हे मोटय़ा प्रमाणावर बावडेकर, हंजे, अश्या विविध दुकानात वन्यजीव प्रतिबंधीत माल सापडला होता.
त्याच्या अनुषंगाने पुढे चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान सोमवार दि. 7 रोजी नाशिक येथील लक्ष्मी पूजा भांडार नाशिक येथे कोल्हापूर वनविभागाने कारवाही करीत लक्ष्मी पूजा साहित्य भंडार या दुकानावर छापा मारून आज एक आरोपी कैलास बबन कुलथे या आरोपीस सोमवारी अटक केले.
या दुकानात इंद्राजाल (ब्लॅक कोरल) व हत्ता जोडी(घोरपड चे गुप्त अंग/लिंग) साळींदर चे काटे, रानडुक्कर दात, इतर काही वन्यजीव अवयव हे विक्रीसाठी साठा केला असल्याचे सापडले आहे.
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत शेडय़ुल 1 भाग 1 मध्ये येते, जे बाळगणे व विक्री करणे हा दंडनीय अपराध आहे. त्यासाठी 7 वर्ष कारावास व 10000 हजार रुपये दंड आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक नाशिक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाही ही विशेष शोध पथक (एस आय टी) यांनी केली. कारवाही मध्ये उपवनसंरक्षक महादेव मोहिते (सातारा) ,विभागीय वनाधिकारी विशाल माळी (कोल्हापूर),मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे (सातारा), सह्यायक वनसंरक्षक अजित साजणे (सांगली), सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे (नाशिक)वनक्षेत्रपाल युवराज पाटील (सांगली), वनक्षेत्रपाल महेंद्र पाटील (नाशिक) , वनरक्षक सागर थोरवत (सांगली), योगेश खैरनार, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेख कुवर नाशिक तसेच मेळघाट सायबर सेल चे जीवन दहीकर यांनी विशेष सहकार्य केले. सर्व वन अधिकारी कारवाई स्वतः नाशिक मध्ये सहभागी झाले होते.









