प्रतिनिधी / सातारा :
शिवथर येथील वनविभागाच्या माळरानात संशयित बाळकृष्ण साबळे याने गुरे चरण्यासाठी नेली. व ही गुरे बाहेर काढण्यास सांगणारे वनमजूर तुषार चव्हाण(वय 27) यांना दमदाटी करून दांडक्याने मारहाण केली. या प्रकरणी वनमजूर चव्हाण यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात साबळे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिवथर येथील रेल्वेस्टेशन फाटकाच्या वरील बाजूस वनविभागाचे माळरान आहे. या माळरानात झाडे लावण्यात आलेली आहे. या झांडाची देखरेख करण्याचे काम हंगामी वनमजुर तुषार रामचंद्र चव्हाण हे करत आहेत. शुकवारी 1 वाजण्याच्या सुमारास चव्हाण हे माळरानात गेले असता त्यांना संशयित बाळकृष्ण वामन साबळे यांची गुरे माळरानात चरताना दिसली. चव्हाण यांनी संशयित साबळे यांना गुरे बाहेर काढण्यास सांगितले. यांचा राग मनात धरून साबळे यांनी वनमजुर चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी करत दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.









