नवी दिल्ली
वनप्लस या कंपनीने भारतीय बाजारात आपला लेटेस्ट स्मार्टफोन वनप्लस 10 प्रो सादर केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रगन 8 जनरेशन 1 चिपसेटही दिलेला आहे. आपल्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या बदलासोबत हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. प्रिमियम सेगमेंटच्या या स्मार्टफोनची भारतीय बाजारात थेट टक्कर ही सॅमसंग गॅलेक्सी एस 22 ची आवृत्ती आणि आयफोन 13 यांच्यासोबत राहणार आहे.
सदरचा फोन हा दोन मॉडेलमध्ये सादर केला आहे. यामध्ये 8 जीबीसह 128 जीबी स्टोरेजची किमत 66,999 रुपये आणि 12जीबीसह 256 जीबी मॉडेलची किमत 71,999 रुपये राहणार आहे. एमराल्ड फॉरेस्ट आणि वॉल्केनिक ब्लॅक कलर अशा दोन रंगात फोन खरेदी करता येणार आहे. जागतिक बाजारात ही किमत 75,500 रुपये राहू शकते. भारतात याची विक्री 5 एप्रिलपासून सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.









