वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वनप्लसने नॉर्ड 2 या स्मार्टफोनची स्पेशल आवृत्ती पॅक मॅन सादर केली आहे. हा फोन विशेष गेमिंग यूजर्ससाठी डिझाईन केला आहे. फोनच्या बॅक कव्हरवर काही डॉटसोबत पॅकमॅन थीम दिली असून यामध्ये 12 जीबी रॅम आणि 265 जीबी स्टोरेज सिंगल मॉडेलमध्ये सादर केला आहे.
सदरच्या फोनची किमत ही 37,999 रुपये राहणार असल्याचीही माहिती कंपनीने दिली आहे.
कनेक्टिविटी ः यामध्ये 5 जीसोबत 4 जी एटीइ, वायफाय 6, ब्लूटय़ूथ व्ही 5.2, जीपीएस, ए जीपीएस, एनएव्हीआयसी, एनएफसी, युएसबी टाईप सी पोर्ट मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
विशेष फिचर्स
w डबल नॅनो सिम सपोर्ट
w अँड्रॉइड 11 सोबत कंपनीचा ऑक्सिजन ओएस 11.3वर सुरु होणार
w 6.43 इंच पूर्ण एचडी व एमोलेड डिस्प्ले मिळणार
w ऑक्टो कोर मीडिया टेक डायमेनसिटी 1200 एआय प्रोसेसर
w 4,500 एमएएच बॅटरी मिळणार









