नवी दिल्ली
स्मार्टफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी वनप्लस यांनी अलीकडेच क्लाउड 11 या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतात आपला वनप्लस 11 आर 5 जी स्मार्टफोन सादर केला आहे. या सादरीकरणानंतर सदरच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेल्याचे दिसून आले. कंपनीने यामध्ये वनप्लस आर आवृत्ती बाजारात आणली आहे.
वनप्लस फ्लॅगशिप हॅण्डसेट वनप्लस 11 आर 5 जी स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोससद्वारे सादरीकरण झाला आहे. स्मार्टफोनची किंमत बेस मॉडेलसाठी 39,999 रुपये असून टॉप मॉडेलची किमत ही 44,999 रुपये राहणार आहे.
स्मार्टफोनची गुणवत्ता
वनप्लस 11 आर 5 जी स्मार्टफोनमध्ये 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 100 वॅट सुपरफास्ट चार्जिंगचा चार्जर यात असणार आहे. मागील बाजूस 50 एमपी सोनी आयएमएक्स 890 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे.









