प्रतिनिधी / बेळगाव
येथील न्यू गुड्सशेड रोड येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वनटच फौंडेशनच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहर आणि परिसरात गोरगरिबांना ब्लँकेट्सचे वाटप करून विधायकता जपली आहे.
याचबरोबर कंग्राळी, ज्योतीनगर, मेन गल्लीत स्वच्छता अभियान व गटारीत साचलेला गाळ काढून हा उपक्रम राबविला. सध्या कोरोनाबरोबरच इतर साथीचे आजार फैलावत आहेत. त्यामुळे आपल्या परिसरातील स्वच्छता नेहमी राखा आणि कोणताही आजार बळावू नये, यासाठी सतर्क रहा, असे आवाहन केले.
या अभियानात सचिव मनोहर बुक्मयाळकर, टी. डी. पाटील, जयप्रकाश बेळगावकर, विजय कसलकर, जोतिबा थोरवत, सुरेश पाटील यांनी पुढाकार घेतला होता. शहर परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱया गारे-गरिबांना ब्लँकेट्स वितरित करण्यात आले. मोहिमेत अध्यक्ष विट्ठल पाटील, बाला नाईक, प्रवीण चंदगडकर, विठ्ठल गोरल, विष्णू बंडगे, दीपक जाधव, प्रज्वल किटवाडकर, विनायक आनंदाचे, विनायक पाटील यांनी सहभाग घेतला. गेली तीन वर्षे या संघटनेमार्फत अनेक गरजूंना आर्थिक खाद्य पदार्थ, कपडे तसेच इतर मार्गाने सहकार्य करण्यात येत आहे. या विधायक कामाचे नागरिकांतून कौतुक करण्यात आले.









