बेळगाव /प्रतिनिधी
जंगलातील वाघांची नेमकी संख्या समजण्यासाठी दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. कोरोनामुळे मागील वर्षभरापासून व्याघ्रगणनेचे काम लांबणीवर पडले होते. मात्र आता 1 फेब्रुवारीपासून वनखात्यामार्फत व्याघ्रगणनेला प्रारंभ होणार आहे.
संपूर्ण देशात व्याघ्र राज्यांमध्ये दर चार वर्षांनी व्याघ्रगणना कार्यपद्धती राबविली जाते. वनखाते, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जाते. प्रत्यक्ष जंगलात पायी चालत प्राण्यांच्या पावलांचे ठसे, वि÷sचा अभ्यास केला जातो. शिवाय सेन्सर आणि टॅप कॅमेऱयाद्वारे वाघांची संख्या निश्चित केली जाते.
खानापूर तालुक्मयातील घनदाट वनराई, बांबूचे आच्छादन, हिरवेगार गवत व बारमाही वाहणारे पाणी यामुळे भीमगड अभयारण्य, लोंढा, खानापूर, कणकुंबी, नागरगाळी आदी ठिकाणी वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये वाघांचादेखील समावेश आहे. चितळ, सांबर व हरिण यांच्या संख्येत वाढ झाल्याने यांच्यावर उपजीविका करणाऱया वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेळगाव वनक्षेत्र वाघांसाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून पुढे येत आहे. व्याघ्रगणनेतून बेळगाव विभागातील वाघांची निश्चित संख्या समजणार आहे. दरम्यान लोंढा, खानापूर, कणकुंबी, नागरगाळी व भीमगड अभयारण्यात वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यावरून वाघांची संख्या समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बेळगाव विभागातील वाघांची संख्या लवकरच समोर येणार आहे.









