विविध रस्त्यांवर 18 हजारांहून अधिक रोपांची वनखात्याकडून लागवड
प्रतिनिधी / बेळगाव
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उष्मा वाढला आहे. त्यामुळे वनखात्याने रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या रोपटय़ांना पाणी घालण्याचे काम हाती घेतले आहे. टँकरच्या साहाय्याने प्रत्येक रोपटय़ाला पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या आठवडाभरापासून रोपटय़ांना जगविण्यासाठी वनखाते मुबलक पाणी देत आहे.
यंदाच्या हंगामात ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर 18 हजारांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळय़ात या रोपांची उत्तम प्रकारे वाढ झाली आहे. मात्र, आता वाढत्या उष्म्यामुळे रोपटय़ांना पाण्याची गरज आहे. याची दखल घेत वनखात्यामार्फत रोपटय़ांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
तालुक्मयातील हिंडलगा, अगसगा, हंदिगनूर, केदनूर, बेनकनहळ्ळी, येळ्ळूर, के. के. कोप्प, मारिहाळ, करडीगुद्दी, काकती, होनगा, देसूर, संतिबस्तवाड, बेकिनकेरे, चलवेनहट्टी आदी भागातील विविध रस्त्यांवर रोपटय़ांची लागवड करण्यात आली होती. लागवड केलेल्या रोपटय़ांपैकी 90 टक्के रोपटय़ांची वाढ झाली आहे, अशा रोपटय़ांना पाणी सोडण्यात येत आहे.









