प्रतिनिधी/ गोडोली
जगात कोरोनाचा कहर सुरू असून जिह्यात ही बाधितांचा आकडा वाढत आहे.शिवथर, वडूथ परिसरातील 18 गावातील रुग्णांना खाजगी,सरकारी रुग्णालयात हि बेड उपलब्ध होत नाहीत. माझ्या जीवाभावाच्या माणसांसाठी वडूथ येथे काही दिवसांमध्ये कोव्हीड सेंटर उभारणार असून तुम्ही घाबरू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे,” असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
वडूथ (ता. सातारा)येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करताना ते बोलत होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील, माजी महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी उप अभियंता खैरमोडे, अभिजीत साबळे, सुनील कासकर,नवनाथ साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे यांनी, सातारा जिह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये वडूथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये10 ऑक्सिजन आणि 10 नॉर्मल ऑक्सिजन बेड तसेच 30 लोकांसाठी काँरनटाईन रूम उपलब्ध करण्यासाठी येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये कोरोना सेंन्टर उभे करणार निश्चित झाले आहे.या परिसरातील रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकणार आहेत. कोरेगाव मतदार संघातील इतरही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या त्या भागातील लोकांसाठी अशी सुसज्ज सेंन्टर उभारणार असल्याची माहिती दिली.’राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी योगदान द्यावे,”असे आवाहन त्यांनी करुन 18 गावातील नागरिकांना मदत करण्याची सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे’,अशी ग्वाही दिली.