जिव्हाळ्याच्या विषयावर आवाज उठवल्याबद्दल शेतकर्यांनी मानले तरुण भारतचे आभार
औंध/वार्ताहर
पंधरा दिवसापूर्वी वडी (ता.खटाव) येथील जळालेला ट्रान्सफार्म विद्युत वितरण कंपनीने बसवला असल्याने बंद ३१ शेतीपंप पुन्हा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर दैनिक तरुण भारतने आवाज उठवल्याबद्दल शेतकर्यांनी दैनिक तरुण भारतचे आभार मानले.
येथील शेळक्याचा ओढा नावाच्या शिवारातील ट्रान्सफार्म पंधरा दिवसापूर्वी जळाला होता. लॉकडाऊन काळात ट्रान्सफार्म जळल्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे कोडे निर्माण झाले. ट्रान्सफार्म बसवण्यासाठी अनेकदा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारले होते. मात्र लाँकडाऊन मुळे ट्रान्सफार्म बसवण्यात विलंब होत होता. कँनालला आवर्तन सुटले आहे. विहरीत देखील पाणी आहे. परंतु विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन ट्रान्सफार्म बसवला. ट्रान्सफार्म कार्यन्वीत झाल्यामुळे विद्युत पंप सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्वांच्या सहकार्याने प्रश्न मार्गी लागला
ट्रान्सफार्म जळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. परंतु लॉकडाऊन मुळे अडचणी वाढत गेल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी जिव्हाळ्याचा विषय लावून धरला. विद्युत वितरण कंपनीने सहकार्य केल्याने प्रश्न सोडवण्यासाठी मदत झाली.
Previous Articleहम नहीं सुधरेंगे
Next Article कोल्हापूर : रांगोळीत सरपंच व सदस्यात हाणामारी








