आई-वडीलांपाठोपाठ तीनही मुले पॉझीटीव्ह
वार्ताहर/ राजापूर
मंगळवारी सायंकाळी दोन टप्प्यात आलेल्या अहवालांमध्ये राजापुर तालुक्यात आणखी 9 कोरोना रूग्ण सापल्याने तालुक्यातील बाधीतांची संख्या 14 झाली. यामध्ये याआधी बाधीत आढळलेलया वडदहसोळ येथील पती-पत्नीच्या तीनही अपत्यांचा नव्या रूग्णांमध्ये समावेश असल्याने संपुर्ण कुटुंबच कारोनाग्रस्त झाले आहे. त्याचबरोबर प्रिंदावणमध्ये 4, तर कशेळी व ओणी येथील प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे.
कोरोनाला थोपवून धरण्यात 13 मे पर्यत यशस्वी ठरलेल्या राजापूर तालुक्यात विखारेगोठणे येथील महिलेचा रूपाने 14 मे रोजी पहिला पॉझीटीव्ह रूग्ण आढळला. त्यानंतर कशेळी आणि वडदहसोळ येथे प्रत्येकी दोन रूग्ण आढळलयाने ही संख्या 5 वर पोहचली. त्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी आणखी 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यात घबराट पसरली आहे.
वदडहसोळ मिरजोळकरवाडी येथे पॉझीटीव्ह आढळलेल्या दांपत्याचे तीनही मुलांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. कशेळीतही यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित रूग्णाच्या कुटुंबातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. ओणी-कोंडीवळे शाळेत क्वारंटाईन असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर प्रिंदावन तळेखाजण येथे एकाचवेळी तब्बल चौघेजण कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कशेळी आणि वडदहसोळ ही दोन्ही गावे कंन्टेनमेंट झोन असून आता ओणी-कोंडीवळे व पिंदावन तळेखाजण गावचा 3 किलोमीटरचा परिसरही कंन्टेनमेंट झोन करण्यात येणार आहे. एकाच वेळी तब्बल 9 रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे.
मुलीचाही अहवाल पॉझिटीव्ह
दरम्यान बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये वडदहसोळ येथील 14 वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीच्या आई व वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मंगळवारी तिच्या भावांचा अहवालही पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर रात्री उशीरा आलेल्या अहवालात ही मुलगीही पॉझिटीव्ह आढळली आहे.









