पुलाची शिरोली /वार्ताहर
कोरोनाच्या काळात चुकीचा उपचार केल्याच्या रागातून मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील स्पंदन क्लिनिक वर दगडफेक करण्यात आली. तसेच तेथील वैद्यकीय मदतनीस शब्बीर हजारी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हिम्मत मोहम्मद बारगीर, हसन मोहम्मद बारगीर, सरताज हसन बारगीर व चंदू हसन बारगीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळी व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : मौजे वडगावचे माजी सरपंच मुबारक बारगिर यांचा काही महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना च्या काळात मुबारक बारगिर यांच्यावरती व्यवस्थित उपचार न केल्याच्या रागातून मुबारक बारगिर यांचे भाऊ व पुतणे यांनी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संजीवनी मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट संचलित स्पंदन क्लिनिक वर दगडफेक केली. तसेच वैद्यकीय मदतनीस शब्बीर हजारी यांच्या मोटारीची तोडफोड केली. व त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. याबाबत शब्बीर यांनी शिरोली एमआयडीसी पोलिसात माहिती दिली. बारगीर यांनीही शब्बीर हजारी यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स.पो.नि.किरण भोसले तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









