चौघा जणांना अटक, 20 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
राजवाडा कंपाऊंड वडगाव येथील चावडीनजीक अंदर-बाहर जुगार खेळणाऱया चौघा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 20 हजार 410 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
राजू रामचंद्र डगेण्णावर (वय 49, रा. लक्ष्मीनगर-वडगाव), निलकंठ मारुती काडसिद्धण्णावर (वय 28, रा. लक्ष्मीनगर-वडगाव), दत्ता वसंत देवरमनी (वय 35, रा. मलप्रभानगर-वडगाव), गंगाधर विठ्ठल बुचडी (वय 46, रा. पाटील गल्ली-वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. चावडीजवळ अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून चौघा जणांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









