शेकडो दिव्यांनी सजला मंदिर परिसर
प्रतिनिधी/ बेळगाव
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या वडगावच्या मंगाई देवी मंदिरात मंगळवारी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. मंगाई देवीला आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली होती. शेकडो दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.
मंदिर परिसरात दिवे लावण्यासाठी वडगाव परिसरातील युवक, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. फुलांची आरास व नेत्रदिपक रांगोळय़ा भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या.









