मानकऱयांच्या बैठकीत घेतला निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱया वडगावच्या मंगाई देवीची यात्रा दरवषी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु कोरोनाचा धोका असल्याने मागील वषीप्रमाणेच यावषीही मंगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय रविवारी झालेल्या मानकऱयांच्या बैठकीत घेण्यात आला.
वडगावच्या मंगाई देवीची यात्रा ही बेळगाव परिसरातील मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. दरवषी हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे दोन-तीन दिवस मोठय़ा प्रमाणात ही यात्रा भरते. यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने लहान विपेत्यांपासून ते अगदी भक्तांपर्यंत सर्वच जण यात्रा कधी होणार याची वाट पाहत असतात.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मागील वषी मंगाई यात्रा रद्द करण्यात आली होती. यावषीही कोरोनाचे सावट असल्याने यात्रा रद्द करण्यात आली आहे. परंपरा खंडित होऊ नये यासाठी धार्मिक विधी तसेच वार पाळणे या विधी केल्या जाणार आहेत. मंगळवार दि. 3 ऑगस्ट रोजी ही यात्रा होणार होती. यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी मंदिर परिसरात येऊन गर्दी करू नये, असे आवाहन चव्हाण-पाटील कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.









