बेळगाव : वडगाव येथील 110 केव्ही विद्युत केंद्रात दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 11 रोजी वडगाव, अनगोळ, शहापूर परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत वीजपुरवठा ठप्प असणार आहे.
भारतनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, चावडी गल्ली, बाजार गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, नाथ पै सर्कल, चिदंबरनगर, इंदिरानगर, झटपट कॉलनी, बाबले गल्ली, भांदूर गल्ली परिसर, भाग्यनगर 9 वा क्रॉस, पारिजात कॉलनी, कृषी कॉलनी, रघुनाथ पेठ, अनगोळ मुख्य मार्ग या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे.









