महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दहा वजनगटात होत असली तरी सर्वांना उत्सुकतात असते खुल्या आणि महाराष्ट्र केसरी गटातील मल्लांच्या वजनाची आज महाराष्ट्र केसरी गटातील मल्लांची वजने झाल्यावर अनेक दिग्गज मल्लांनी वजनात शंभरी पार केली.
कुस्ती जेवढा मनाचा आणि चपळाईचा खेळ आहे त्यापेक्षा कित्तेक पट वजनाला या खेळात महत्त्व आहे. दंगल चित्रपटासाठी आमिर खानने वजन वाढवायला घेतलेल्या कष्टामुळे हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला वास्तविक सातारच्या आखाडय़ावर पोहोचलेला ओपन गटातील प्रत्येक मल्ल आपआपल्यामध्ये आमिर खान आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा 86 किलो वजनापेक्षा अधिक असलेल्या मल्लांना मिळते. त्यामुळे 86 किलो पर्यंत वजन वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसले जातात. यासाठी कष्ट आणि लाखो रुपयांचा खर्च येतो. अनेकदा वजन वाढवणे सोपे ठरते मात्र ज्या मल्लांना आपआपल्या गटातल्या कुस्त्या करायच्या आहेत. त्यांना वजन नियंत्रीत ठेवण्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात.
नरसिंग यादव आंतरराष्ट्रीय मल्ल असल्यामुळे त्याला 74 किलो वजन ठेवणे बंधनकारक असते तर महाराष्ट्र केसरीसाठी तो पुन्हा वजन 86 किलोच्या पुढे आणतो. नरसिंग हा कुस्तीच्या वजन प्रकारात आयडॉल मानला जातो.
यंदाच्या आखाडय़ातील मल्ल व वजन
गादी गटात आदर्श गुंड 117
हर्षवर्धन सदगीर 104
आकाश केसवाणी 116
अक्षय मदने 111
गणेश जगताप104
दिग्विजय जाधव 111
अक्षय शिंदे 103
मेघनाथ शिंदे 119
तर माती गटातील
बाला रफिक शेख 129
गुलाब आगरकर 111
माऊली जमदाडे 106 शुभम सिदनाळे 116 विलास डोईफोडे 107 सिकंदर शेख 103 महारुद्र काळेल 107 किरण भगत 107 महेद्र गायकवाड 124. व अन्य.
वजनाला अनन्यसाधारण महत्त्व
कुस्ती स्पर्धेत मल्लांच्या वजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या वजनगटात खेळण्यासाठी मल्ल आपले वजन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. वजन वाढले असल्यास स्पर्धेपूर्वी काही मल्ल डायटवर राहून वथनाचा काटा अपेक्षित जागेवर आणण्यात यशस्वी होतात तर कमी वजनाचे मल्ल ओपन गटात खेळताना वजन वाढवण्यावर भर देतात. त्यामुळे स्पर्धा म्हटले सर्वाना वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते मल्लांचे वजन वाढले तर त्याला आपल्या वजनगटातून बाहेर पडावे लागले.