सीमकार्ड संदर्भातील कॉलद्वारे संपर्क
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत नामवंत वकिलाचा मोबाईल हॅक करून व्हॉटस्ऍप ग्रुपवर अश्लिल व्हिडीओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े हा प्रकार सोशल मीडियाद्वारे व्हायरल होताच गोंधळ उडाल़ा त्या वकिलांविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आल़े मात्र घडला प्रकार या वकिलाला समजताच त्यांनी शहर पोलिसात धाव घेत अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केल़ी
ऍड. दिलीप भावे असे या वकिलांचे नाव आह़े शनिवारी सकाळी ऍड. भावे यांच्या मोबाईलवर तुमचे बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होणार आहे, असा संदेश आल़ा संदेशात दिलेल्या क्रमांकावर भावे यांनी फोन केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाह़ी मात्र काही वेळातच अज्ञात इसमाने भावे यांना फोन करून तुमचे सिमकार्ड बंद होणार आह़े ते चालू ठेवण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितल़े
केवळ ऍप डाऊनलोड करावयाचे असल्याने भावे यांनी आपल्या मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करून घेतल़े यानंतर संबंधित इसमाने भावे यांना सिमकार्ड चालू ठेवण्याचे चार्जेस म्हणून 11 रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितल़े पैसे भरण्याविषयी सांगताच भावे यांच्या मनात शंका आली. यात काहीतरी गौडबंगाल असण्याचा संशय आल़ा यामुळे भावे यांनी पैसे भरण्यास नकार दिल़ा तसेच संबंधित इसमाशी बोलणे टाळल़े
ऍड. भावे यांनी 11 रुपये भरण्यास नकार दिल्याच्या कारणातून पुढे विपरितच घडल़े यावेळी संशयित इसमाने भावे यांना ऍप डाऊनलोड करण्यास भाग पाडले होत़े पण त्या ऍपद्वारे आपली फसगत होईल, याची तसूभरही कल्पना भावे यांना नव्हत़ी भावे हे रत्नागिरीतील नामवंत वकील असल्याने त्यांचा मित्रपरिवार व कामाशी संबंधित जनसंपर्कही मोठा आह़े त्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर विविध सोशल मीडिया ग्रुप व लोकांकडे होता. भावे यांचा मोबाईल नंबर डाऊनलोड ऍपद्वारे अज्ञात व्यक्तीने हॅक केल़ा काही वेळातच संबंधिताने त्यांच्या मोबाईल नंबरवरून सर्व ग्रुप व पर्सनल नंबरवर अश्लिल व्हिडीओ पाठवल़े
ऍड. भावे यांना या प्रकाराची कल्पना नव्हत़ी काही वेळानंतर मित्रपरिवारातून भावे यांना कॉल येऊ लागल़े त्यांनी घडला प्रकार भावे यांच्या कानावर घातल़ा आपला मोबाईल हॅक झाला असून तो ग्रुपमधून काढून टाकावा, असे त्यांनी मित्रपरिवाराला सांगण्यास, कळविण्यास सुरूवात केल़ी शहर पोलिसांत धाव घेत अज्ञात इसमाविरूद्ध तक्रारही दाखल केल़ी
नागरिकांनी सावधानता बाळगावी- पोलिसांचे आवाहन
मोबाईलवर कॉल करून ऑनलाईन गंडा घातल्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत़ त्यामुळे कोणतेही ऍप डाऊनलोड करताना काळजी घ्य़ा बँक संबंधित माहिती अनोळखी व्यक्तीला सांगू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आह़े








