वृत्तसंस्था/ डेहराडून
भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारियाला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील शानदार कामगिरी केल्याने उत्तराखंड शासनातर्फे 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
शुक्रवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग थामी यांनी ही घोषणा केली आहे. उत्तराखंडची कन्या वंदनाने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून तिचे देशातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आलिंपिकच्या इतिहासात यावेळी प्रथमच राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. दरम्यान कास्यपदकाच्या लढतीत ब्रिटनकडून भारताला 4-3 असा पराभव पत्करावा लागल्याने भारताचे पदक थोडक्यात हुकले.









