दीड वर्षात काम होणार पूर्ण, अंदाजे 11 कोटी रूपये येणार खर्च
सुशांत कुरंगी / बेळगाव
काकती व नव्याने बांधण्यात आलेल्या होनगा विज उपकेंद्रातून आसपासच्या गावांना विजपुरवठा होतो. परंतु गावांची संख्या मोठी असल्यामुळे अनेकवेळा विजेच्या समस्या उद्भवत होत्या. आता या परिसरातील विजेच्या समस्या कमी होणार असून वंटमूरी गावानजिक 110 केव्ही विज उपकेंद्राला मंजूरी मिळाली असून यासाठी अंदाजे 11 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.
होनगा गावापासून ते हुक्केरी तालुक्मयाच्या सीमेपर्यंत होगना व काकती या दोनच उपपेंदातून विज पुरवठा करण्यात येतो. त्यातच होगना येथील औद्योगिक वसाहतीची व्याप्ती वाढत जात असल्यामुळे या दोन्ही उपकेंद्रांवर भार वाढत होता. होगना येथे मागील वर्षी केआयएडीबीने विज उपकेंद्र उभारले. परंतु त्यातील अद्याप काही काम बाकी आहे. त्यामुळे ते उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. केआयएडीबीचे वरि÷ अधिकारी हे बेंगळूर येथे असल्याने या उपकेंद्राचे काम रखडले आहे.
आसपासच्या नागरिकांना सुरळीत विजपुरवठा करण्यासाठी केपीटीसीएलने वंटमूरी येथे एक 110 केव्ही क्षमतेचे उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱयांची परवानगी मिळताच कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. जुलै 2019 मध्ये हेस्कॉमने हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया होणार आहे.
या गावांना होणार फायदा
वंटमूरी गावानजिक घाटामध्ये हे उपकेंद्र उभारले जाणार आहे. या भागातील वंटमूरी, सुतकट्टी, शिवापूर, होसूर, बमनट्टी, जुमनाळ, हेग्गेरे, भूतरामहट्टी, घुगरेनट्टी, उक्कड, गोडीहाळ, इदलहोंड, मरणहोळ या गावांना या उपकेंदातून विज पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे होनगा व काकती येथील विज केंद्रांवरील भार कमी होणार असून सुरळीत विजपुरवठा करण्यास मदत होणार आहे.
पावसाळय़ानंतर विजकेंद्राच्या कामाला सुरूवात होणार आहे. संपूर्ण काम पूर्ण होण्यास दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे जानेवारी 2022 पर्यंत या उपकेंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. काकती उपकेंद्रातून 20 ते 30 किमी अंतरावर वाहिन्या घालून विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी कुठेही बिघाड झाल्यास पुढील सर्वच गावांना त्यांचा फटका बसत होता. या उपकेंद्रामुळे सुरळीत विजपुरवठा करणे शक्मय होणार आहे.
प्रविणकुमार चिकाडे (कार्यकारी अभियंता, ग्रामीण)
तालुक्मयाचा विस्तार वाढत असल्याने विजेच्या वाढ होत आहे. परंतु विज केंद्रांची क्षमता तितकीच असल्याने विजेची समस्या निर्माण होत होती. यासाठी वंटमुरी येथे 110 केव्ही उपकेंद्राचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून काही दिवसातच कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









