वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेतील विद्यमान विजेत्या मुंबई सिटी एफसी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा प्रशिक्षक पदावरून पायउतार झाले आहेत. आता मुंबई सिटी एफसी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी डेस बकिंगहॅम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्जिओ लोबेरा यांच्याबरोबर मुंबई सिटी एफसी संघाने यापूर्वी एक वर्षासाठी करार केला होता. आता या संघाने बकिंगहॅम यांच्याबरोबर दोन वर्षासाठी नवा करार केला आहे. 2021-22 च्या इंडियन सुपलिग फुटबॉल हंगामात आता बकिंगहॅम यांचे मुंबई सिटी एफसी संघाला मार्गदर्शन लाभणार आहे. लोबेरा यांनी प्रमुख प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई सिटी एफसी संघाने लिग विनर्स म्हणून करंडक पटकाविला. इंग्लंडचे बकिंगहॅम हे लवकरच मुंबई सिटी एफसी संघामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी त्यांना गोव्यात काही दिवसांसाठी क्वॉरंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.









