वार्ताहर / पुलाची शिरोली
लोक सहभागातून साकारला सिक्सर काॅलनी मधील रस्ता. उद्योजक धनाजी पाटील यांचा पुढाकार.
तलावाच्या पश्र्चिम भागात असलेल्या रेणूका नगर व सिक्सर काॅलनी कडे जाणारा रस्ता तलावातून वाहणारे व पावसाच्या पाण्यामुळे अत्यंत खराब झाला होता. यामुळे लहान मुले व वयोवृद्ध लोकांना ये जा करताना ञास सहन करावा लागत होता. त्यामुळे या प्रभागाचे सदस्यांकडे रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी येथील नागरीकांनी वारंवार व्यथा मांडल्या होत्या. पण त्यांनी दुर्लक्ष केले.
अखेर धनाजी पाटील यांनी पुढाकार घेऊन एका दिवसात हा रस्ता तयार केला. सुमारे २५ ट्राॅली काळी खंगर ओतून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तयार केला. यासाठी त्यांना सुमारे तीस हजार रुपये खर्च आला आहे.या कामाबद्दल नागरीकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









