आवळी बुद्रुक/प्रतिनिधी
कोरोना संकटाच्या महामार्गामुळे देश लॉकडाऊन झाला असून पूर्ण सीझन वाया गेला असल्याने सर्व लोक कलाकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वयोवृद्ध कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यातच माहे मार्च २०२० पासून महाराष्ट्र शासनाकडून कलाकारांचे मानधन थकीत आहे तरी आपणास थकीत मानधन मिळावे, या काळात शासनाकडून कलाकारांना अनुदान मदत मिळावी. असे निवेदन कोल्हापूर लोककलाकार सांस्कृतिक शिक्षण संघटनेच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
यावेळी आनंदराव बाप्पू पाटील, बाजीराव बाबुराव खांडेकर, भगवान बाबुराव पाटील, बाबुराव खुटाळे, गणपती कातकर, शांताराम चौगुले, सदाशिव पाटील, सातापा जाधव, अरुणा कुंभार, मीरा पाटील, शिवाजी पाटील आदी लोक कलाकार उपस्थित होते.