वेबसीरिजचा ट्रेलर सादर
मार्व्हल कॉमिकचे प्रसिद्ध पात्र लोकीवर आधारित वेबसीरिजचा दुसरा सीझन मागील काही काळापासून चर्चेत आहे. पहिला सीझन गाजल्यावर चाहते आता याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. अशा स्थितीत निर्मात्यांनी त्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. लोकी 2 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

पहिला सीझन 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता सुमारे दोन वर्षांनी निर्माते दुसरा सीझन घेऊन येत अहेत. 2 मिनिटे 26 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये सीरिजचा सारांश दाखविण्यात आला आहे. टॉम हिडलेस्टन याच्यासह जोनाथन मेजर्स आणि ओवेन विल्सन तसेच सोफिया डि मार्टिनो, गुगु मबाथा-रॉ, वुन्मी मोसाकू, यूजीन कोर्डेरो, तारा स्ट्राँग आणि नील एलिस हे कलाकार यात दिसून येतील.
मार्व्हल स्टुडिओजचा लोकी 2 प्रेक्षकांना हॉटस्टारवर पाहता येणार आहे. ही सीरिज 4 भाषांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये ही सीरिज उपलब्ध होणार आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.









