प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला बऱयाच गोष्टी लपवायच्या आहेत किंवा लोकांना त्यांच्या अनेक गोष्टींबद्दल माहिती व्हायला नको, म्हणूनच आजपर्यंत लोकायुक्त किंवा माहिती आयुक्तांची नेमणूक केली नाही, असा अरोप आम आदमी पक्षाचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी केला पत्रकार परीषदेत केला आहे. तसेच या संस्थावर त्वरीत योग्य व्यक्तीची निवड करावी अशी मागणी देखील म्हांबरे यांनी यावेळी केली.
डॉ. प्रमोद सावंत सरकारने 21 अहवालांपैकी एका अहवालावरही कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे आधीचे लोकायुक्त न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) प्रफुल्ल कुमार मिश्रा जे की पूर्णपणे निराश झाले होते तसेच दिलेल्या अहवालाची दखल घेतली जात नसेल तर अशा संस्थेने का कार्य करावे, असा प्रश्न स्वतः लोकायुक्तांनी उपस्थित केला होता. ज्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये गोवा सोडताना लोकायुक्त संस्था रद्द करण्याची शिफारस केली होती कारण ती सार्वजनिक निधीचा मोठय़ा प्रमाणात नाश आहे. असे सांगितले होते, हे म्हांबरे यांनी सर्वांच्या लक्षात आणले.
लोकायुक्त ही एक लोकपाल संस्था आहे जी लोकांना लोकसेवेच्या कार्यक्षमतेवर आणि अखंडतेवर विश्वास ठेवण्यासाठी भ्रष्टाचाराविरूद्ध तक्रार करण्यासाठी व्यासपीठ देते. गोव्यातील शेवटच्या लोकायुक्तांना 191 प्रकरणे मिळाली होती, त्यापैकी 133 प्रकरणांचे निराकरण करण्यात आले आणि 21 प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणांचे अहवाल पाठविण्यात आले, ज्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. लोकांपासून लपवून ठेवण्यासाठी सरकारकडे अनेक गोष्टी असल्यासारखे दिसते आहे म्हणूनच लोकांनी त्या पदासाठी अर्ज केले असले तरी नवीन माहिती आयुक्ताची नेमणूक केली जात नाही, असे म्हांबरे पुढे म्हणाले.









