प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्याचे दक्षिण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले खानापूर तालुक्मयातील मलप्रभा नदीवर हबनहट्टी येथे वसले आहे. स्वयंभू मारुतीची मूर्ती असलेले तीर्थक्षेत्र श्री हबनहट्टी देवस्थान येथे सर्वलोक सेवा फौंडेशन बेळगावचे विरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले. चोवीस तास ऑक्सीजन पुरविणारे पिंपळ, वड, बेलपत्र, पेरु, आंबा अशा झाडांची रोपे लावण्यात आली.
भाविकांनी अनवधानाने मंदिर परिसरात टाकलेला कचरा गोळा करुन स्वच्छता करण्यात आली. यापुढे भाविकांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी व लावलेल्या रोपांचे संवर्धन करावे, असे आवाहन विरेश हिरेमठ यांनी केले.
मंदिराचे पुरोहित संजीव केस्तिकर यांच्यासह फौंडेशनचे हणमंत नाईक, बाळू नाईक, मदन कुडतुरकर, पंढरी कुडतुरकर, राजू कर्लेकर, दौलत कुर्लेकर, शामराव गावडे, मिथुन कुंभार, रोहित पाटील, बाळू कणबरकर, भावकाना आनंदाचे, रमेश पाटील आदी उपस्थित होते.









