नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. बिर्ला यांनी 19 मार्च रोजी कोरोना चाचणी केली होती. संसद अधिवेशन सुरू असतानाच बिर्ला यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने अधिवेशन कालावधीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांनी बिर्ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱयांकडेही त्यांनी चौकशी केली आहे. तसेच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेसुद्धा एम्समधील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.