कंग्राळी बुद्रुक
कोरोनाच्या महामारीने हैराण केल्यामुळे 1 नोव्हेंबर या काळय़ा दिनी प्रशासनाने सायकल फेरी काढण्यास सम्मती दिली नाही. यामुळे सायकलफेरी, मूक मोर्चा रद्द केला. तरीही आपली महाराष्ट्रात जाण्याची तळमळ कंग्राळी बुद्रुक म. ए. समिती बैठकीत ऍड. सुधीर चव्हाण यांनी बोलून दाखविली.
1 नोव्हेंबर रोजी म. ए. समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर दंडाला काळय़ा फिती बांधून आयोजित निषेध बैठकीमध्ये ते बोलत होते. निषेध बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी जि. पं. सदस्य हणमंत पुजारी होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमे, अशा घोषणा देऊन आपल्या महाराष्ट्रात जाण्याच्या भावना व्यक्त केल्या. कन्नड भाषेला आमचा विरोध नाही. परंतु कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर सक्ती करत आहे. त्याला आमचा विरोध आहे.
बैठकीला मल्लाप्पा पाटील, मयूर बसरीकट्टी, अनिल पावशे, व्यंकट पाटील, तानाजी पाटील, सुभाष चिखलकर, संजय जांबोटकर, मल्लाप्पा अष्टेकर, कृष्णा हुरुडे, महादेव हुद्दार, ओमकार चव्हाण, जयराम पावशे, साईल पाटील, गणेश पाटील, शंकर पाटील, नागेश हुरुडे, लक्ष्मण हुरुडे, कल्लाप्पा हुरुडे, सुभाष कोळी, विनायक हुरुडे, किरण चव्हाण, मोनाप्पा कोळी, महेश कोळी, शिवानंद कोळी, मोहन मोरे, अनिल तारिहाळकर, कृष्णा कोळी, गोपाळ पाटील, राजू चव्हाण, निखिल भेकणे, भरत पाटील, ओमकार पाटील, विनायक भेकणे, बालाजी चव्हाण, सुरज पाटील, महंतेश चिखलकर, ऋतिक पाटील, सचिन पाटील, गजानन पवार, रवि चव्हाण, रमेश पाटील, मोहन भैरटकर, प्रवीण चव्हाण, बाळकृष्ण कोळी, भूषण पवार, स्वस्तिक पाटील, सचिन पाटील, मदन पवारसह मराठी भाषिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शंकर कोनेरी यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद चव्हाण यांनी आभार मानले.









