कराड / प्रतिनिधी
कोरोना प्रसाराच्या मंदावलेल्या वेगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्या संदर्भाने जिल्हाधिकारी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना जनजागृती करण्यासाठी पत्र पाठवले होते. याला प्रतिसाद देत लोकशाही आघाडीच्या जनजागृती वाहनाचा शुभारंभ सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत हिंगमिरे आबा, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, पोपटराव साळूंखे, सुहास पवार, श्री अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, मुसद्दीक आंबेकरी, अमित शिंदे, सचिन चव्हाण, महेश पाटील, राहुल भोसले, रतन कांबळे, प्रकाश पवार उपस्थित होते









