सातारा / प्रतिनिधी
पुणे पदवीधर मधून भाजपाने आजवर फक्त आरएसएस विचारसरणीची माणसं दिली, लोकशाहीचा आत्मा जीवंत ठेवायचा असेल तर सर्वमान्य उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी केले.
आजवर पडविधारांच्या प्रश्नावर विरोधक आम्ही हे करू, आम्ही ते करू नुसती आश्वासने देत आहेत पण आम्ही कृतीवर विश्वास ठेवतो, एवढं सगळं या मतदार संघात आवश्यक होतं तर मग गेल्या दोन टर्म मध्ये एकही काम का केले नाही असा सवाल महाविकास आघाडीचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण गणपती लाड यांनी केला. कराड येथे महाविकास आघाडीच्या नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम, मंत्री बाळासाहेब पाटील उमेदवार अरूण गणपती लाड, प्राचार्य मोहन राजमाने, प्रा.यशवंत पाटणे, प्राचार्य शेजवळ सर उपस्थित होते.
Previous Articleमोटार सायकल चोरी प्रकरणी जोडगोळीला अटक
Next Article आयटीआय प्रवेश प्रक्रियेबाबत आवाहन









