युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
प्रतिनिधी/ म्हापसा
भारतीय युवक काँग्रेसचा संघ भारतीय लोकशाही वाचविण्यासाठी लढा लढत आहे. ही लढाई जिंकेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी प्रदेश युवक काँग्रेसने म्हापसा येथे आयोजित ‘लोकशाही वाचवा’ या निषेध मोर्चात केले. या मोर्चात 500 पेक्षा अधिक लोकांचा सहभाग होता.
प्रदेश यूथ काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्रादे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, काँग्रेस नेते तुलियो डिसोझा, विजय भिके, प्रदीप नाईक, अर्चित नाईक, वरद म्हार्दोळकर, प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, एल्वसि गोम्स, विकास प्रभुदेसाई, अमन लोटलीकर आदी उपस्थित होते. व पीवायसीचे अन्य सदस्यदेखील या मोर्चात सहभागी झाले होते.
श्रीनिवास पुढे बोलताना म्हणाले की, मोदी सरकार हे मोदींचे ‘मित्र’ गौतम अदानी यांना वाचविण्यासाठी लोकशाहीची हत्या करत आहे. त्यामुळेच आपल्याला त्रासदायक ठरणारे प्रŽ विरोधक सातत्याने विचारत असल्याने त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
श्रीनिवास यांनी यावेळी मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी या प्रŽावर लोकसभेत प्रŽ विचारताच त्यांच्याविरोधातील प्रलंबित प्रकरण पुन्हा ताजे करण्यात आले. न्यायाधीश बदलण्यात आले. प्रकरणाचा निर्णय देताना शिक्षादेखील सुनावण्यात आली. जलद वेगाने त्यांना अपात्रदेखील करण्यात आले. हे सर्व काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याला गप्प करण्याच्या उद्देशानेच करण्यात आले.
गोवा प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्रादे म्हणाले की, आम्ही हे लक्षात घेतली पाहिजे की आमच्या नेत्याने संसदेत प्रŽ विचारल्यानंतर तातडीने त्यांच्याविरोधातील प्रकरण उकरून काढून त्यांना अपात्र करण्यात आले. अदानी व पंतप्रधान मोदी यांचे नाते काय आहे? तुम्ही प्रŽ विचारल्यास तुम्हाला थेट लक्ष्य केले जाईल, असा संदेश भाजप सरकारच्या कृतीतून स्पष्ट दिसत आहे.









