प्रतिनिधी/ फोंडा
केरया-खांडेपार येथे लोकवस्तीजवळ आलेल्या प्रशस्त आकाराच्या मगरीला फोंडा वन्यजीव विभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या पकडून बोंडला अभयारण्यात तिची रवानगी केली. गुरुवारी सकाळी 10 वा. सुमारास केरया येथील श्री विष्णू सोमनाथ मंदिर जवळील ओहोळातून ही मगर वर आली होती. स्थानिकांनी वनखात्याला त्यासंबंधी माहिती दिल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या मगरीचे वयोमान दहा वर्षांच्या आसपास असून वजन चारशे ते साडेचारशे किलो आहे. बचाव पथकातील रमाकांत नाईक, अली शेख, देऊ शेटकर, किरण साळगावकर, रामा देरगुणकर, प्रमोद वेळीप, अक्षय गांवस व सचिन सावंत यांनी अथक प्रयत्नानंतर मोठय़ा शिताफीने या मगरीला जेरबंद केले.









