प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या कोनवाळ गल्ली शाखेच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शाखा व्यवस्थापक सचिन कावळे यांनी प्रास्ताविक केले. लोकमान्यचे सभासद नीता शिरोडकर, डॉ. राजेश्री अनगोळ, राजेश्री पुरोहित, कल्पना कलघटगी, अश्विनी मासूर, स्मिता समर्थ, रूपा नावगेकर, रुक्मिणी नावगेकर, अक्षता निंगण्णावर, शारदा संगण्णावर, मनाली अनगोळकर, अर्चना चव्हाण, गंगा कुलकर्णी, पूजा तांजी यांचा सत्कार करण्यात
आला.
अश्विनी मुतकेकर, तेजश्री कपिलेश्वरी, रूची कावळे यांनी आलेल्या महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सोसायटीचे कर्मचारी नागेश पाटील, सुधीर गुरव यांनी सहकार्य केले.









