प्रतिनिधी / बेळगाव :
आर्थिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवत रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने सालाबादप्रमाणे यावषीही ‘उन्नती 2020 एक पाऊल प्रगतीकडे’ हा महिलांसाठीचा भव्य असा तिळगूळ समारंभ दि. 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत मराठा मंदिर येथे होणाऱया या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर यांचे मार्गदर्शन आणि ‘हे मन बावरे’ या मालिकेतील संयोगिता म्हणजेच शर्मि÷ा राऊत या लोकप्रिय अभिनेत्रीची उपस्थिती हे उन्नतीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. सदर कार्यक्रम महिलांसाठीच असल्याचे कळविण्यात आले आहे.
नेहमीप्रमाणेच यावषी बौद्धिक, वैचारिक आणि मनोरंजक अशा त्रिसुत्रीवर उन्नतीचा कार्यक्रम होत आहे. आर्थिक बचत आणि गुंतवणूक किती महत्त्वाची आहे आणि महिलांनी बचत करणे किती आवश्यक आहे, याबद्दल कांचन परुळेकर मार्गदर्शन करतील. तर महिलांशी संवाद साधताना शर्मि÷ा राऊत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीचा प्रवास उलगडणार आहेत.
कांचन परुळेकर
कांचन परुळेकर या शिक्षणतज्ञ डॉ. व्ही. टी. पाटील यांच्या मानस कन्या आहेत. अर्थातच त्यांच्या सामाजिक नेतृत्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये शिक्षिका आणि एनसीसी ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्या रुजू झाल्या. उपव्यवस्थापक म्हणून काम करत असतानाच त्यांनी स्वेच्छेने नोकरी सोडली व महिला सक्षमीकरण कार्यात स्वतःला झोकून दिले.
महाराष्ट्रातील सर्व मानाच्या वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकल्या आणि उत्तम वक्त्या म्हणून त्या नावारुपाला आल्या. उद्योजकता विकास, महिला आणि उद्योग, बचतगट संकल्पना या क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्या परिचित आहेत. याच क्षेत्रात समुपदेशक म्हणूनही त्या काम करतात. 9 हजार शहरी व 30 हजार ग्रामीण महिलांचे संघटन त्यांनी केले असून 3 हजार उद्योजिका आणि 150 प्रशिक्षिका तयार केल्या आहेत. 3 हजार युवक-युवतींना कमवा व शिका हा मंत्र दिला. हजारो बचत गटांना बचतगट संकल्पना समजावून देऊन अनेकांना उद्योग सुरू करून दिले. महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव येथील संस्थांना कृती योजना आखून देऊन त्या कार्यान्वित करून दिल्या. महिला उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी स्वयंप्रेरिता महिला औद्योगिक संस्था स्थापन केली. डॉ. व्ही. टी. पाटील फौंडेशनतर्फे दुर्गम भागात शेती तंत्र, व्यवसाय, शिक्षण, कुक्कुटपालन, गांडुळ खत शेती, कंत्राटी शेती, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर या क्षेत्रातील त्यांच्या प्रयोगाचे अनेक ठिकाणी अनुकरण केले गेले.