प्रतिनिधी/कोल्हापूर
25 व्या रौप्यमहोत्सवी यशस्वी पदार्पण केलेल्या लोकमान्य सोसायटीच्या कोल्हापूर क्षेत्रिय कार्यालयातर्फे खास महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ व वाण देणेचा समारंभ ‘उन्नती 2020’ केशवराव भोसले नाटयगृहामध्ये नुकताच साजरा करणेत आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून पद्मजा तिवले या महिला सामाजिक कार्यकर्त्या लाभल्या.
सुरवातीस गणेशवंदना व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. अकौन्ट मॅनेजर सौ. प्रगती जगताप यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचा उद्देश विस्तृत केला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार सोसायटीच्या मार्केटींग मॅनेजर सौ. मालिनी बाली यांचे हस्ते करणेत आले. तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या डॉ. नसिमा हूजरूक, डॉ सरोजा शिंदे, अर्पिता शेलार, ऐश्वर्या मुनिश्वर, शुभदा कामत, संयोगिता पाटील, गौरी देशपांडे, रेखा दुधाने, सोनिया पाटील, अनुराधा भोसले या 10 महिलांचा सत्कार तिवले, रिजनल मॅनेजर दिलीप पाटील आणि असि. रिजनल मॅनेजर जाधव यांच्याकडून झाला.
सत्कारास प्रतिनीधीक उत्तर म्हणून डॉ. हूजरूक व डॉ. शिंदे यांचे समयोजित भाषण झाले. नंतर मनोरंजन व गुणदर्शनाच्या कार्यक्रमात फनी गेम्स, स्पॉटर गेम्स, नृत्य, सैराटी डान्स यांसारखा कार्यक्रमांना महिलांनी डोक्यावर घेतले. शेवटी बक्षीसांचा लकी ड्रॉ काढला जावून 4 महिलांना खालीलप्रमाणे बक्षीसे वितरण करणेत आली.
- सोनाली जाधव – पैठणी साडी, 2. सविता भोसले – चांदीचा करंडा 3. रोहिनी करांडे – चांदीचा देवदास दिवा, 4. सविता सुगंधी – चांदीचे अगरबत्ती स्टॅन्ड









