प्रतिनिधी पेठ / वडगांव
लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी पेठ वडगाव शाखेचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. प्रतिमेचे पूजन कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाचे व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी केले यावेळी त्यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी ची स्थापना १९९५ साली झाली असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दै. तरुण भारतचे समुह प्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकूर यांनी केली असून संस्थेत ४ हजार ८०० कोटी पेक्षा जास्त ठेवी असून संस्थेचा कारभार महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व दिल्लीसह २१३ शाखेमार्फत चालवला जातो.
पेठ वडगाव शाखेस आज पाच वर्षे पूर्ण झाली असून शाखेत सहा ठेवी कोटी असून संस्थेमार्फत कर्ज, पर्यटन, विमा, पॅन कार्ड यांसह अनेक सोयी सुविधा पुरवल्या जातात. अल्पावधीत संस्थेने केलेली प्रगती नेत्रदीपक असून नागरिकांनी संस्थेमध्ये ठेवी ठेवून संस्थेशी ऋणानुबंध वाढवावेत तसेच लोकमान्य सोसायटीची ठेवीदारांसाठी २७ महिन्यात वीस हजार रुपये गुंतवून करून पंचवीस हजार रुपयेचा परतावा मिळवून देणारी लोकमान्य सिल्वर जुबली नावाची ठेव योजना आहे. याचाही लाभ गुंतवणूकदार यांनी घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाचे उपव्यवस्थापक आर. डी. पाटील, अंबप वाहनधारक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग लोकरे, सेक्रेटरी जनार्दन कापसे, पेठ वडगांव शाखेचे उपशाखा अधिकारी गौरव जयतालकर,सहाय्यक लिपिक सागर कुंभार, गणेश शिंदे, यांच्यासह अमृत पवार, दत्तात्रय पेटकर, कृष्णात मोरे, निखिल पवार,रामदास तांबे, प्रशांत पाटील व संस्थेचे ठेवीदार, हितचिंतक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









