हरमल / वार्ताहर
लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी हरमल शाखेच्यावतीने शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शिक्षक फ्रान्सिस डिसौझा(हरमल) पद्माकर परब(पालये)वासुदेव परब(पालये)फ्रान्सिस मेंडोंसा (हरमल)विणा मांदेकर (मांदे)व पत्रकार चंद्रहास दाभोलकर (हरमल)यांचा शाखा प्रबंधक नरेश पेडणेकर यांनी लोकमान्य टिळकांचा फोटो व फुलांचे रोपटे देऊन सन्मानित केले.लोकमान्य पतसंस्थेची हरमल शाखा सुरू झाल्यास 25 वर्षे पूर्ण झाली.कोविडमुळे रौप्यमहोत्सव साजरा करता आला नाही.परंतु ठेवीदार,ग्राहकांच्या विश्वासामुळे लोकमान्यांच्या शाखातील कर्मचारी सेवा देण्यात कुचराई करीत नाहीत.सध्या ग्राहकांसाठी अनेकविध योजना चालू असून दुचाकी वाहनांचा विमा,वैयक्तिक विमा,तसेच अन्य व्यवहराबाबत सविस्तर माहिती दिली.समाजात वावरताना सुसंस्कृत पिढी घडविण्यकामी शिक्षकांचे योगदान महत्वाचे असून पतसंस्था त्यांच्याप्रती आदर दाखवीत असून चांगले कार्य नेहमीच चालू ठेवावे असे शाखा प्रबंधक नरेश पेडणेकर यांनी व्यक्त केले.लोकमान्य पतसंस्था संस्कृती व नातेसंबंध टिकविण्यासाठी आग्रही असून लोकांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी सदोदित वावरत आहेत,असे पेडणेकर यांनी व्यक्त केले.
शिक्षकांच्यावतीने सरकारी हायस्कूल तोरसे मधून निवृत्त झालेले वासुदेव परब(पालये) यांनी लोकमान्य पतसंस्थेचे चेअरमन किरण ठाकूर यांचे अभिनंदन केले व भविष्यात संस्थेला यश मिळो असे उदगार काढले.हरमल शाखेत ठेवीदार लहान मुलांचे व जे÷यांचे वाढदिवस साजरे करून मित्रत्वाचे नाते जोडीत असल्याबद्दल परब यांनी समाधान मानले.
लोकमान्य पतसंस्था, सांस्कृतिक क्षेत्रांत तसेच आरोग्य,विमा,शिक्षण,पर्यटन आदी क्षेत्रांतही उत्कृष्टपणे कार्य करीत असून गोव्याच्या प्रगतीत खारीचा वाटा असल्याचे निवृत्त शिक्षक परब यांनी व्यक्त केले.यावेळी शाखेच्या उपप्रबंधक नीलिमा पेडणेकर,निकिता फेर्ना?डिस,अनुजा गावडे व साईशा बगळी यांनी विविध ठेवी योजनांची माहिती दिली.चहापान झाल्यानंतर शाखा प्रबंधक नरेश पेडणेकर यांनी आभार मानले.









