प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य गंथालयामध्ये जगदीश कुंटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गंथालयाचे कर्मचारी, बुक लव्हर्स क्लबचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
रावसाहेब वागळे कॉलेज खानापूर
खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमध्ये लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. दामोदर वागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर यांनी महात्मा गांधी यांच्या फोटोला पुष्पहार घातला. यावेळी कर्नल दीपक गुरूंग, विनायक जाधव, प्राचार्या शरयु कदम, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत उल्लेखनिय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.









