बेळगाव/ प्रतिनिधी
लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त (पूर्व संध्येला)
नक्षत्रांचे देणे हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमाला धारवाड येथील ए. बी. जोशी यांचे सौजन्य लाभले आहे. याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती सांगणारे छायाचित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी 4 ते 9 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.









