प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फाउंडेशनने इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या सहकार्याने आमटे हायस्कूलमध्ये मासिक आरोग्याबाबत मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. इनरव्हीलच्या अध्यक्षा शालिनी चौगुले आणि डॉ. आसावरी संत यांनी मुलींना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व सांगितले.
डॉ. आसावरी संत यांनी मासिक पाळीशी संबंधित अनेक मिथकांचा पर्दाफाश केला आणि त्या दूर करण्याची गरज आहे, असे समजावून सांगितले. तरुण मुलींनी काल्पनिक गोष्टींपासून लांब राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांना चांगल्या मासिक स्वच्छतेबद्दल आणि वैयक्तिक स्वच्छतेबद्दल शिक्षित केले.
या शिबिरात 100 तरुणींनी सहभाग घेतला. यावेळी लोककल्प फाउंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्यावतीने मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. बेळगावच्या इनरव्हील क्लबने मुलींना फेस मास्क आणि कॅल्शियमच्या गोळय़ांचेही मोफत वाटप केले. याप्रसंगी लोककल्प फौंडेशनचे स्वयंसेवक आणि शिक्षक उपस्थित होते.









