प्रतिनिधी/खानापूर
खानापूर तालुक्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आठवर पोहोचला आहे. लागण झालेले सर्वजण लोंडा येथील आहेत त्यामुळे लोंढा गावात एकच धास्ती निर्माण झाली आहे. लोंढा येथे चार दिवसापूर्वी 72 जणांची स्वब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी आजच्या अहवालात आठ जणांचा समावेश असून त्यामध्ये 58 वषीय एक महिला व अनुक्रमे 55,40,23,33,40, 16,33 वषीय 7 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एका पत्रकाराचा ही समावेश आहे. तालुक्मयातील हा कोरोना पॉझिटिव्हचा वाढता आकडा धास्ती निर्माण करणारा असून जो कोणी आपली तपासणी करायला जाईल त्यापैकी बहुतांशी लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने तपासणीला जाण्यास लोक धजावत आहेत. तालुक्मयात आतापर्यंत 86 जणांना कोरोनाची लागण झाली. रविवारी तीघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये एक यडोगा येथील महिला व दोन खानापूरातील पुरुषांचा समावेश आहे.









