बाबुराव देसाई यांच्या समर्थनात लोंढा वन कार्यालयावर विराट मोर्चा : अधिकाऱयावर त्वरित कारवाई करण्याची मागणी

वार्ताहर /खानापूर
लोंढा विभागाचे वन विभागीय अधिकारी प्रशांत गौराणी यांच्याविरोधात लोंढा भागातील विविध शेतकरी संघटना अक्रम-सक्रम शेतकरी समितीसह जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबुराव देसाई यांच्या समर्थकांनी सोमवारी धडक आंदोलन करून धरणे आंदोलन छेडले. यावेळी लोंढा विभागाचे वन विभागीय अधिकारी प्रशांत गौराणी हे भ्रष्ट अधिकारी असून सर्वसामान्य व शेतकरीवर्गाची ते पिळवणूक करत आहेत. शिवाय या भागाचे लोकप्रतिनिधी असलेल्या जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबुराव देसाई यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून जीवे मारण्याची धमकी देणाऱया त्या अधिकाऱयाला तालुक्मयातून हद्दपार करावे व या प्रकाराची सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी लोंढा भागातील अनेक गावातून हजारो कार्यकर्त्यांनी लोंढा वन विभागाच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली व वनाधिकारी प्रशांत गौराणी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. मागील आठवडय़ातत जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबुराव देसाई तसेच लोंढा वनाधिकारी प्रशांत गौराणी यांच्यात एका गावातील समस्यांवरून शाब्दिक वाद झाला होता. या वादातून गौराणी यांनी आपल्या कार्यालयात बोलावून बाबुराव देसाई यांना पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप बाबुराव देसाई यांनी केला आहे. यावरून गेल्या चार दिवसात खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱयांनी वनमंत्री तसेच पक्षाच्या वरिष्ठापर्यंत या प्रकरणाची तक्रार केली आहे. व तात्काळ सदर वन विभागीय अधिकाऱयाला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व तालुक्मयातून त्याला अन्यत्र बदली करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परंतु या गोष्टीला आठ दिवस उलटले तरी सदर अधिकाऱयावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने सोमवारी धडक मोर्चा काढून याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हा पंचायत माजी सदस्या अंजना देसाई म्हणाल्या, प्रशांत गौराणी हा अधिकारी भ्रष्ट असून या भागातील गोरगरीब जनतेची तो पिळवणूक करतो. हप्तेवारीमध्ये अधिकाऱयाने या भागातील अनेक व्यावसायिकांना त्याने लुटले आहे. रात्रीच्या वेळी आपण जंगलाचे रक्षण करतो, प्रामाणिक ड्य़ुटी करत असल्याचे सांगून चोरटय़ांच्या पाठीशी सदर अधिकारी नेहमी असतो. मात्र गोरगरीब जनतेला जंगलातील जळाऊ लाकूड देखील घेण्यास मज्जाव करतो. अशा या अधिकाऱयाची तात्काळ बदली करण्यात यावी, तसेच जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबुराव देसाई यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱया या अधिकाऱयाला या ठिकाणी राहण्यास कोणताच अधिकार नाही. एखादेवेळी बाबुराव देसाई यांच्या जीविताला काही धोका झाल्यास हाच अधिकारी जबाबदार राहील, यासाठी वरि÷ांनी देखील याची गांभीर्याने दखल घेऊन त्या अधिकाऱयाची तात्काळ बदली करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी तालुका जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनीही या मोर्चात सहभाग घेऊन प्रशांत गौराणीसारखा एखादा अधिकारी एखाद्या लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर तालुक्मयातील जनतेने गप्प बसावे का, अशा अधिकाऱयाला या ठिकाणी राहण्याचा कोणताच अधिकार नाही याची वरि÷ांनी देखील तात्काळ बदली करावी, अशी मागणी केली. तसेच वन खात्याच्या विभागीय अधिकाऱयांना निवेदन सादर करून याची आठवडय़ाभरात दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या धरणे आंदोलन व मोर्चामध्ये लोंढा येथील अक्रम-सक्रम शेतकरी संघटना, बाबुराव देसाई यांचे तालुक्मयातील अनेक समर्थक उपस्थित होते.









