लॉस एंजल्स
कॅलिफोर्नियातील सर्वात दुसऱया नंबरच्या मोठय़ा अशा लॉस एंजल्स शहरामध्ये कोरोनाच्या लाटेची शक्मयता लक्षात घेत लोकांना घरातसुद्धा मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश गुरुवारी सरकारने जारी केला असून सदरचा नियम शनिवारपासून अंमलात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे लस घेतलेल्या व न घेतलेल्या अशा नागरिकांना घरात मास्कची सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याची बाब येथील सार्वजनिक आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. मुंटू डेव्हिस यांनी पत्रकारांशी बोलताना, गेल्या आठवडय़ातच दरदिवशी येथील कोरोना रुग्णसंख्या हजारच्या घरात पोहोचली असून प्रसाराचा वेग थांबवण्यासाठी वरील सक्ती सरकारला करणे भाग आहे. 400 जण कोरोनांतर्गत विविध इस्पितळात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती बिघडू नये यासाठी सरकारने मास्कबाबतची सक्ती शनिवारपासून लॉस एंजल्समध्ये करण्यात आली असल्याचा खुलासा केला आहे.









